कर्मदाता, अन्नदाता, द्रष्टिदाता, कर्मवीर मल्हारी बापूसाहेब एक जीवंत उदाहरण
bapusaheb

जळगांव जिल्हा चाळीसगांव तालुक्यातिल मोठे खेडगांव येथील नामवंत व्यक्ति मल्हारी बापूसाहेब महाजन यांच्या जीवनातिल प्रेरक प्रसंगाची सखोल माहिती घेऊन सुरत येथील पत्रकार मनोहर महाजन द्वारा त्यांची जीवन कहानी प्रस्तुत केली गेली आहे...
सूरत । चाळीसगाव तालुक्याचे मोठे खेडगाव गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व अलौकिक आदर्श शेतकरी श्री बापूसाहेब मल्हारी महाजन यांचे वर्ष श्राद्ध विधी 2 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाली। बापूसाहेब यांनी 88 वर्षी जगाचा शेवट चा निरोप घेऊन विलीन झाले। त्यांचा संपूर्ण जीवनपट पाहिला तर जीवनामध्ये त्यांनी खूप संघर्ष केला सहा बहिणी चार भावंड अशा परिवाराचा उदरनिर्वाह केला त्यांच्या परिवार मध्ये दोन मुलं दोन सुना चार नातवंड त्यांनी जीवनात खूपच संघर्ष करून दोन्ही मुलांना दर्जेदार व उच्च शिक्षण देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला। थोरला मुलाला वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर बनवले तर लहाना् मुलाला पत्रकारिता क्षेत्रात यशस्वीरिते कार्यरत केले । बापूसाहेब मल्हारी महाजन यांच्या बाबतीत सर्वात कौतुकास्पद प्रशसनिय व उल्लेखनीय कामगिरी केली आहे तसेच त्यान्नी दोन्ही सुनांना पदवीधर उच्च शैक्षणिक ग्रॅज्युएट डिग्री असलेल्या सुनांना प्रेरणा दिल्या । आपल्या दोन्ही सुनांना कधीही सुना न मानता मुलीसारखं प्रेम केले सुनांनी ही सुध्दा मुलींच प्रेम दिले। अत्यंत अविस्मरणीय बाब म्हणजे चारही नातवंड उच्च शिक्षित केले बापूंची मोठी नात स्नेहल एमबीए ची पदवी घेवून अमेरिकेच्या कंपनीत कार्यरत आहे। बापूंचे नात जावई सुद्धा आदित्य एमबीए होऊन अमेरिकेच्या कंपनीत कार्यरत आहेत। दुसरा नातू प्रसन्न एमबीबीएस ची डिग्री घेऊन बी.एस. एम.डी. मेडिसिन ची डिग्री साठी कार्यरत आहे। तिसरा नातू अनिकेत बीई आयटी ला आहे तर चौथा नातू दीपक इंग्लिश मीडियम कॉलेज प्रथम वर्षांत शिक्षण घेत आहे। असा बापूंनी शैक्षणिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आपला ठसा या पंचक्रोशीत उमटलेला दिसतो। बापूसाहेबांनी परिवारासाठीच नाही तर सामाजिक गोरगरिबांसाठी सुद्धा खूप कार्य केलेले आहेत त्यांचे जेवण एक टप्प्याटप्प्याने आयुष्यभर उमलत गेले एक आदर्श शेतकरी म्हणून ओळखले जाणारे बापूसाहेब व्यापारी म्हणून प्रसिद्ध असल्याने धुळे भाजीपाला मार्केट ट्रस्टच्या वतीने आदर्श शेतकरी म्हणून प्रस्तुत करण्यात आले होते बापूंनी आपले शेती नाही तर गावातील अनेक लोकांचे शेतीमधून भाजीपाला फळ फळावण धुळे मार्केटला ट्रकच्या ट्रक माल विकला आहे गावात सुद्धा त्यांनी अनेक छोटे छोटे व्यापारी करणाऱ्यांना आपला माल सप्लाय करून बापूंनी व्यापार करताना वैचारिक दृष्टीने व्यापार केला आहे गरीब लोकांना मार्केटमधून माल न आणता आपल्या शेतातील भाजीपाला व फळ फळावण त्यांनी कमी दारात विकला आहे अनेक गोरगरिबांचा उदरनिर्वाह चालायचा गावाचे भिल्ल लोक बापूंचे भावंडासारखे होते वीस वर्ष मागचा कालावधी पाहिला तर भिल्ल लोकांना खायला नसायचे त्यावेळेस बापूंनी त्यांचा उदरनिर्वाह आपल्या शेतीमधून करायचे अनेक गरीब लोकांचे बापूसाहेब दाता होते सामाजिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा बापूसाहेब हजेरी लावत होते गावात एकच ब्राह्मण असल्याने बापू ने अनेक गरीब लोकांचे लग्न सुद्धा लावून बापूंनी ब्रह्मानाची विधी पार पाडली आहे तसेच भागवत कथा रामायण यांच्या पष्टीकरण करून लोकांना माहिती द्यायचे सहा फूट पहाडी आवाज साधे सरळ व्हाईट शर्ट धोती टोपी असा बापूंचा जीवनाचा ठसा उमटलेला दिसतो चाणक्य सारखी बुद्धिशाली बापूसाहेब सर्व समाजामध्ये मिळवून मिसळणारे माळी समाजाच्या मंदिराच्या जागेसाठी सुद्धा त्यांनी खूप संघर्ष केला त्यांनी गावांमध्ये कधीही जातिवाद केला नाही खेडगाव खेडी विविध विकास कार्यकारी सोसायटी मधून बापू साहेबांनी निवडून आल्यानंतर आपल्या पाच वर्षाचा कालावधीत गरीब लोकांच्या सहायता केले आहे बापूसाहेब नेहमी गावाच्या विकासासाठी धडपड करायचे आपले आयुष्य परिवारासाठी नाही तर सामाजिक दृष्टीने अर्पण केले बापूसाहेब मल्हारी उपला महाजन 88 वर्षी जगाचा निरोप घेऊन विलीन झाले दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांचे वर्षश्राद्ध सुखकारक आनंददायक त्यांची विधी करून त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी अतोनात प्रयत्न करून डॉक्टर सुदेश मल्हारी महाजन आणि रिपोर्टर भरत मल्हारी महाजन यांनी बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली दिली.